शाल पांघरुन आलेल्या दहशतवाद्यांनी केला गोळीबार! प्रत्यक्षदर्शीची साक्ष

श्रीनगर – शांल पांघरुन शांतपणे चालत आलेल्या दहशतवाद्यांनी गांदरबलमध्ये अंदाधूंद गोळीबार केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्याच्या कामाच्या जागी कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कँटिनमध्ये हा गोळीबार करण्यात आला.

ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी आपल्या शालीमध्ये शस्त्रे लपवली होती. ते आले तेव्हा कामगार जेवत होते. या ठिकाणाहून १०० मीटर अंतरावर एक लग्नसमारंभ सुरु असल्याने आधी गोळ्यांचा आवाजही ऐकू आला नाही. बांधकाम कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या धावपळीनंतर या ठिकाणी हल्ला झाल्याचे समजले. या घटनास्थळापासून जवळच सीआरपीएफची छावणीही आहे. हल्ला झाला तेव्हा परिसरात अंधार होता. या हल्ल्यात एक डॉक्टर, मध्यप्रदेशचा एक इंजिनियर आणि पंजाब-बिहारमधील ५ मजुरांना जीव गमवावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी लष्करच्या द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने स्विकारली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top