सांगली-मिरज तालुक्यातील समडोळी येथे प्रथमाचार्य आचार्य शांती सागरजी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार ५ सप्टेंबर रोजी महामहोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सद्भावना रॅलीचे आयोजन केले आहे.
वीर सेवा दल,दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाच्यावतीने हा महामहोत्सव पार पडणार आहे.यादिवशी निघणार्या सद्भावना रॅलीमध्ये वीर सेवादलाचे हजारो स्वयंसेवक,कार्यकर्ते, वाद्यपथक,पथनाट्य कलावंत आणि राष्ट्रीय संदेश देणारे देखावे यांचा समावेश असणार आहे.त्याचप्रमाणे यादिवशी सकाळी शांतीद्वीप प्रज्वलन,विश्वशांती प्रार्थना आणि अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार आहे.तसेच दुपारी शांतीकलश रथ प्रवर्तन शांतीसद्भावना रॅलीसह मुख्य कार्यक्रम होणार आहे.