नाशिक – नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर ,काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शहीद झाल्यानंतर भेदभाव कशासाठी असा सवाल राहुल गांधीन केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान गोहिल विश्वराज सिंह आणि सैफत शिट या दोन अग्निवीरांचे निधन ही एक वेदनादायक घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी तीव्र संवेदना आहे. या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्याचे उत्तर भाजपला देता येत नाही. सरकार अपयशी ठरले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, गोहिल आणि सैफ यांच्या कुटुंबीयांना वेळेवर नुकसानभरपाई मिळेल का? जी इतर कोणत्याही जवानाच्या हौतात्म्याइतकीच आहे. अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही का? जेव्हा दोन्ही सैनिकांची जबाबदारी आणि बलिदानासमान आहे, मग त्यांच्या हौतात्म्यानंतर हा भेदभाव का? अग्निपथ योजना लष्करावर अन्याय असून आपल्या शूर जवानांच्या हौतात्म्याचा अपमान आहे. एका सैनिकाचा जीव दुसऱ्या जवानाच्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान का आहे, याचे उत्तर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी द्यावे
शहीद सैनिकांबाबत भेदभाव का ? राहुल गांधींचा सरकारला सवाल
