लुधीयाना – लुधीयाना येथील शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिल्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेला दावा या शहीदाच्या कुटुंबियांनी फेटाळला असून केंद्र सरकारकडून केवळ ४८ लाख रुपयेच मिळाल्याचे शहीद अजय सिंग यांच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे .शहीद अजय सिंगचे वडील चरनजित सिंग यांनी या संदर्भात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना भेटून आपल्याला मिळालेल्या नुकसानभरपाईची माहिती दिली. राहुल गांधी यांनी संसदेत अग्निवीरांची बाजू मांडल्याबद्दल त्यांनी आभार मानले. चरणजीत सिंग यांनी म्हटले की, आम्हाला केवळ पंजाब सरकारने एक कोटी रुपये दिले. कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्हाला भरपाईची पूर्ण रक्कम मिळालेली नाही .