नवी दिल्ली- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. बाबासाहेब यांच्याबद्दल श्रद्धा असती तर त्यांनी असे व्यक्त केले नसले. पंतप्रधान मोदी यांनी रात्री १२ वाजण्याआधीच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे,अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की,आम्ही बाबासाहेब यांच्याबद्दल खूप बोलतो, पण तुम्ही त्यांच्याबद्दल असे का बोललात ? त्या दोघांची चांगली मैत्री आहे.ते एकामेकांचे पाप पाठीशी घालतात. मोदी त्यांचे पाप लपवत आहेत.आंबेडकर हे संपूर्ण देशात पूजनीय आहेत.या लोकांचा संविधानावर विश्वास नाही.मनुस्मृतीत महिलांचा आदर नाही. त्या मनुस्मृतीचे भाजपावाले कौतुक करतात. पंतप्रधान मोदींनी अमित शहांच्या बचावासाठी सहा ट्विट केले.याची काय गरज होती? आंबेडकरांबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.नाहीतर देशातील लोक शांत बसणार नाही.