महाबळेश्वर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहकुटुंब महाबळेश्वर येथे मुक्कामासाठी आले आहेत. याठिकाणी त्यांचा पाच दिवसांचा मुक्काम असून ते विश्रांतीसाठी आले आहेत. हा त्यांचा संपूर्ण दौरा खासगी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
शरद पवार यांचे महाबळेश्वर येथे काल रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका खासगी बंगल्याच्या हेलिपॅडवर आगमन झाले. ते कुटुंबीयांसह आले असून ७ मार्चपर्यंत मुक्काम असल्याचे सांगितले जात आहे. महाबळेश्वर पर्यटस्थळी राजकीय नेतेमंडळींचे विश्रांतीसाठी नेहमीच येणे जाणे असते. देशातील दिग्गज राजकारण्यांचे महाबळेश्वर प्रेम सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर अनेक नेते, नामवंत उद्योगपती, सिनेअभिनेते हवा बदलासाठी व निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर येथे येत असतात. पवार यांच्या दौर्यावेळी पोलिस प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. ते राहत असलेल्या बंगला व परिसरात कुणालाही प्रवेश नसून ते कुणाला भेटणार नाहीत. ते पर्यटनासही बाहेर पडणार नसल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार सहकुटुंब महाबळेश्वर मुक्कामी
