पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करत आहेत. मात्र,त्यांची तब्येत बरी नसल्याने पुढील चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
प्रशांत जगताप म्हणाले की, गेले दोन दिवस शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. खोकला असल्यामुळे बोलण्यास त्रास होत आहे. म्हणून त्यांना भाषण करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण समारोहाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे.