ठाणे – शरद पवार गटाचे नेते कळवा-मुंब्राचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ब्राम्हण बोलावून शास्त्रोक्त पूजा केल्यानंतर आपला निवडणूक अर्ज दाखल केला. अर्ज भरताना त्यांच्यासोबत शरद पवार खास उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी आव्हाडांनी सलग तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. आता चौथ्यांदा जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यावेळी त्यांना महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नाजिब मुल्ला यांचे आव्हान असणार आहे.
आव्हाडांनी मुंब्र्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत खुद्द शरद पवारांनी भर उन्हात उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, माझा विजय निश्चित आहे . पण थोडा वेळ वाट पाहा , लीड महत्वाचा आहे. वरचा परमेश्वर बघत आहे , कोणाला जिंकवायचं तो ठरवेल. माझा बाप एवढ्या उन्हात आला , मला आणखी काय पाहिजे.
शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचा उमेदवारी अर्ज दाखल
