शरद पवारांची बुधवारी
चेंबुरमध्ये जाहीर सभा

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चेंबूरमध्ये बुधवारी युवा मंथन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमादरम्यान सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार जाहीर सभा देखील घेणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चेंबूरमध्ये बुधवारी युवा मंथन कार्यक्रम घेण्याचे ठरवले. या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार एक जाहीर सभा देखील घेणार आहे. पवार आपल्या सभेतून कोणावर निशाणा साधतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Scroll to Top