Home / News / शबरी आवास योजनेतर्गत मिळणार ३०० फुटांचे घर

शबरी आवास योजनेतर्गत मिळणार ३०० फुटांचे घर

मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – राज्य सरकारने रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण)अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या निर्णयामुळे शबरी आवास योजनेतर्गत आता ३०० फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापुढे रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) व आदिवासी विकास विभागाची शबरी आवास योजना (ग्रामीण) यांच्या अनुदानामध्ये प्रति घरकुल वैयक्तिक घरकुलासाठी दोन लाख ५० हजार रुपये इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.ही अनुदान पूर्वी दोन लाख रुपये इतके होते.शबरी घरकुल योजनेंतर्गत आदिवासी कुटुंबांना त्यांचे कच्चे घर पक्के बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत देत असते.तर अशीच मदत रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच नवबौद्ध कुटुंबांना दिली जात असते.

Web Title:
संबंधित बातम्या