नाशिक – नाशिक महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.नाशिक महापालिकेचे गंगापूर धरण पंपिंग केंद्र येथे महावितरण कंपनीच्या सातपूर येथील १३२ के.व्ही.आणि महिंद्रा येथील दोन फिडरवरुन वीजपुरवठा होतो. याठिकाणी पंपिंगद्वारे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या जलशुध्दीकरण केंद्रांना पाणी पुरवठा करण्यात येतो. गंगापूर धरणातील पंपिंग केंद्रात काही तांत्रिक काम करण्यात येत असून या कामात अडचणीच्या ठरणाऱ्या वाहिनींचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी संपूर्ण शहर परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शनिवारी नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार
