सावंतवाडी- कुडाळ मालवण मतदारसंघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर निलेश राणे म्हणाले की, आमच्या सोबत जनता आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या सोबत असतो. त्यामुळे आम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. या मातीने आम्हाला खूप काही दिले आहे त्यामुळे ह्या मातीचे ऋण आम्ही विसरू शकत नाही. मला ह्या मातीतच काम करायचे आहे. माझे काम लोकांना पटत असेल तर लोक मला मोठ्या मताधिक्य्याने निवडून देतील.