मुंबई – जगात सर्वात लोकप्रिय असलेले चॅटिंग ॲपलीकेशन व्हॉट्सॲप सातत्याने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन सुविधा घेऊन येत असते. आता व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी एडिट मेसेज फीचर घेऊन आले आहे. यामुळे वापरकर्त्याने एकदा पाठवलेला मेसेज एडिट करता येणार आहे. सध्या काही बीटा चाचणी वापरकर्त्यांसाठी हे फिचर उपलब्ध करण्यात आले आहे.
व्हॉट्सॲप मेसेज एडिट बटण फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सध्या उपलब्ध झाले आहे. जगातील सर्व बीटा वापरकर्त्यांसाठी कंपनी ही दमदार सुविधा घेऊन आली आहे. व्हॉट्सॲपने अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी एडिट बटण रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी व्हॉट्सॲपने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲप वेबवर एडिट फीचर सादर केले होते, आता कंपनी हेच फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देखील आणत आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज एडिट केला असता, त्या व्यक्तीला कळेल की तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल केले आहेत.