नवी दिल्ली – नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे (आयटी नियम) पालन करण्यास नकार दिल्याने व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
याचिकाकर्ते, ओमानकुट्टन के. जी. यांनी यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन न केल्यास केंद्र सरकारने व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती.
याचिकाकर्ते, ओमानकुट्टन के. जी. यांनी यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन न केल्यास केंद्र सरकारने व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली होती.