सेंटो डोमिंगो- व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मधुरो यांच्यावरील निर्बंधांची अंमलबजावणी करताना अमेरिकेने त्यांचे खासगी विमान दासो ऑफ फाल्कन ९०० ईएक्स हे डोमिनिका रिपब्लिकमधून जप्त केले आहे.या विमानाची किंमत एक कोटी तीस लाख अमेरिकी डॉलर आहे. अमेरिकेने हे विमान जप्तकरून फ्लोरिडाकडे नेले आहे.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर लादलेल्या निर्बंधांचा भंग करून हे विमान आयात करण्यात आले होते आणि बेकायदेशीररीत्या खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेने ही कारवाई केली आहे. अमेरिकेचे ॲटर्नी जनरल मेरिट बी.गारलँड यांनी या घटनेचे गांभीर्य सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या निर्बंधांचे जो उल्लंघन करेल आणि अमेरिकेच्या साधनस्रोतांचा वापर करेल त्याच्यावर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून कारवाई करण्यात येईल. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांच्याशी संबंधित बनावट कंपनीने हे विमान खरेदी केले होते. कॅरेबियन बेटांवर या बनावट कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. नंतर हे विमान कॅरेबियन बेटावरून व्हेनेझुएललाला नेण्यात आले होते व्हेनेझुएलाचे हे विमान डोमेनिकॉन रिपब्लिक मध्ये आलेले असताना अमेरिकेच्या सरकारने स्थानिक सरकारच्या सहकार्याने विमान जप्त करण्याची कारवाई केली.