व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख! १४ जानेवारीला पदभार स्वीकारणार

बंगळूरू- इस्रोचे(भारतीय अंतराळ संशोधन संस्था) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते १४ जानेवारीला इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस.सोमनाथ यांची जागा घेणार आहेत.नारायणन सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत.
लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरच्या संचालक पदाच्या संपूर्ण कार्यकाळात नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित करण्यात आले.त्यांनी जवळपास चार दशके इस्रोत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन यामध्ये ते तज्ञ आहेत. त्यांनी जीएसएलव्ही एमके ३ च्या सी२५ क्रायोजेनिक प्रकल्पाचे संचालक म्हणून काम केलेले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली सी२५ स्टेज यशस्वीपणे विकसित केले गेले.याबरोबरच नारायणन यांनी आदित्य अंतराळयान आणि जीएसएलव्ही एमके ३ मिशन्स आणि चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ च्या मोहिमेमध्ये देखील त्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय असून त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता इस्रोला पुढे जाण्यास महत्वाची ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top