व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन विधेयक

न्युयॉर्क- व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीयांसाठी अमेरिकेतील जॉब व्हिसा मिळणे सोपे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेमधील सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो. त्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी शुक्रवारी यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये म्हणजे अमेरिकन संसदेच्या खालच्या सभगृहात द्विपक्षीय विधेयक मांडण्यात आले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि जीओपीचे लॅरी बुशॉन यांनी द्विपक्षीय विधेयक सादर केले आहे. राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. त्यामुळे जगभरातील उत्कृष्ट आणि कुशल कर्मचारी वर्गाला येथे येण्यास मदत होते. सध्याचा कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ देशाच्या आधारावर रोजगार-आधारित व्हिसा देण्याची संख्या मर्यादित आहे. म्हणजे अमेरिकन नोकरीसाठीचा अमेरिकन व्हिसा मिळणाऱ्यांची संख्या प्रत्येक देशानुसार वेगवेगळी आहे. यानुसार काही देशांना जास्त व्हिसा तर काहींना कमी व्हिसाची परवानगी दिली जाते. नवीन कायद्याचा उद्देश अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकट करणे हा आहे,

Scroll to Top