अहमदनगर- आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करू, असा इशारा नृत्यांगना गौतमी पाटील हिने दिला आहे. अहमदनगर मधील नवनागापूर येथे गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. यावेळी त्यांनी थेट दगडफेक केली. या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली.
नवनागापूरच्या सरपंचांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा गोंधळ झाला. या गोंधळामुळे गौतमीला आपला कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला. यानंतर गौतमीने प्रतिक्रिया दिली. ‘यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्यात येईल. गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, असे तिने जाहीर केले.
व्यवस्थित बंदोबस्त केला नाही तर कार्यक्रम रद्द करू! गौतमी पाटीलचा आयोजकांना इशारा
