कटरा – जम्मू काश्मीर येथील माता वैष्णोदेवी च्या भवन मार्गावर आज दुपारी झालेल्या भूस्खलनामध्ये २ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.माता वैष्णोदेवीच्या नव्या भवन मार्गावर पंची हेलीपॅडजवळ दुपारी अडीच वाजता हे भूस्खलन झाले. भूस्खलनानंतर मोठ्या प्रमाणात दगड व माती या मार्गावर उभारण्यात आलेल्या मंडपावर पडले. त्यामुळे काही ठिकाणी हा मंडप व त्यावरचे पत्रे कोसळले. यावेळी मार्गावरुन चालत असणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असून त्यांच्या बचावासाठी माता वैष्णोदेवी बोर्डच्या वतीने मदत व बचाव कार्य करण्यात आले.
वैष्णोदेवीच्या भवन मार्गावर भूस्खलन! २ ठार ३ जखमी
