Home / News / वैभववाडीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वैभववाडीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वैभववाडी-सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात गेले महिनाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंब फुटले आहेत.त्यामुळे...

By: E-Paper Navakal

वैभववाडी-सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात गेले महिनाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंब फुटले आहेत.त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष महेश कदम यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

तालुक्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची झोड सुरू आहे. अनेकदा ढगफुटीसदृश पाऊस तर काही वेळा वादळीवाऱ्यांसह पाऊस झाला आहे.गेले महिनाभर तालुक्यात पाऊस सतत पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कित्येक एकरमधील भातपिकांचे नुकसान झाले आहे.भातपिकाची लोंबी जमिनीवर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे तर पावसाच्या पाण्यात भातपीक राहिल्याने पिकाला कोंब फुटले. वर्षभर मेहनत करून पिकविलेले पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.या शेतकऱ्यांना तुटुपुंजी मदत न देता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे आणि सरसकट शेतकऱ्यांना भरपाई द्यावी,अशी मागणी कदम यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या