वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट उलटून या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास घडली. आनंद पुंडलिक पराडकर (५२) आणि रघुनाथ धर्माजी येरागी (४९) अशी या दुर्घटनेत बुडून मृत झालेल्या खलाशांची नावे आहेत.वनिवती पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री ८.३० वाजता निवती येथील मच्छीमार अनिता आनंद धुरी यांची ‘धनलक्ष्मी’ ही मच्छीमारी बोट १४ खलाशांना घेऊन मच्छीमारीसाठी गेली होते. मध्यरात्री निवती समुद्रातून परतीचा प्रवास करत असताना बोट उलटली. यावेळी मच्छीमारीसाठी वापरली जाणारी गिलनेट जाळी दोघांच्या अंगावर पडल्याने त्यात गुरफटून पराडकर आणि येरागी यांचा मृत्यू झाला. १२ खलाशी पोहून किनाऱ्यावर आल्याने त्यांचा जीव वाचला.