वेंगुर्लेत सीएनजीचा मोठा तुटवडा रिक्षाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन सीएनजी गॅसचा मोठा तुटवडा भासत असून यामुळे चार चाकी वाहन चालकांसह रिक्षाचालक हैराण झाले आहेत.अख्खी रात्र गॅसच्या रांगेत घालवावी लागत असल्याने हे रिक्षाचालक संतापले आहेत.तरी मागणीप्रमाणे तत्काळ सीएनजी गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर रिक्षाचालकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

वेंगुर्ले तालुक्यात १७० रिक्षा सीएनजी गॅसवर चालणार्‍या आहेत.सध्या उन्हाळी सुट्टीनिमित्त चाकरमानी आपल्या गावी आल्याने रिक्षाचालकांचा व्यावसाय तेजीत असताना सीएनजी गॅसचा तुटवडा भासू लागला आहे.शहरात एकच सीएनजी गॅस पंप असून दिवसातून एकदाच ४०० किलो गॅसचा पुरवठा याठिकाणी केला जातो. हा गॅस शहरातील सर्व वाहनांसाठी पुरत नसल्याने सध्या मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.रात्रभर गॅससाठी पंपावर रांगेत थांबावे लागत आहे. रात्री आठ वाजता रांगेत गेल्यावर सकाळी आठ वाजता नंबर येत आहे. त्यामुळे हे रिक्षाचालक संतापले आहेत.लवकर परिस्थिती पूर्ववत झाली नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा या रिक्षाचालकांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top