वेंगुर्ले – येथील श्री देवी भराडी देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंगळवारी सकाळी ८ वाजता श्री देवी भराडीची विधीयुक्त पाद्यपूजा, ९ वाजता सुहासिनींसाठी कुंकुमार्जन, १० वाजता सत्यनारायण महापूजा,१२.३० वाजता महाआरती,महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गोवा येथील भजनी मंडळाचे भजन, रात्री ८ वाजता कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचे १६ ट्रिकसिनयुक्त ”त्रिखुर ब्रह्मांड ”प्रलय” हे नाटक होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवी भराडी प्रासादिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
वेंगुर्लेत भराडी देवस्थानचा २ मे रोजी वर्धापनदिन सोहळा
