Home / News / वीज चोरीप्रकरणी सपाचे खासदार जिया बर्क यांच्याविरोधात गुन्हा

वीज चोरीप्रकरणी सपाचे खासदार जिया बर्क यांच्याविरोधात गुन्हा

संभल – संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्याविरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी आणि त्यांचे वडील ममलूक बर्क यांच्याविरोधात वीज कर्मचार्‍यांना...

By: E-Paper Navakal

संभल – संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्याविरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी आणि त्यांचे वडील ममलूक बर्क यांच्याविरोधात वीज कर्मचार्‍यांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ममलूक यांनी वीज कर्मचाऱ्यांना ‘सत्तांतर झाले आणि आमचे सरकार आले,तर बघून घेईन’,अशा शब्दात धमकावले होते.या घटनेनंतर वीज कर्मचाऱ्यांनी झिया यांच्या घराचा वीज पुरवठा बंद केला आहे.
संभलमध्ये वीज चोरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यासोबत बर्क यांच्या घरात विजेच्या वापरात अनियमितता झाल्याची माहिती वीज विभागाला मिळाली होती. त्यानंतर या भागात वीज कर्मचार्‍यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहिम सुरू केली.आज पहाटे वीज कर्मचार्‍यांचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बर्क यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या घरातील दोन्ही जुने मीटर काढत असताना मीटरमध्ये छेडछाड करुन वीज चोरी केल्याचे वीज कर्मचार्‍यांच्या निदर्शनात आले.स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जुने मीटर तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले. ही कारवाई सुरू असतानाजिया बर्क यांच्या वडिलांनी वीज कर्मचार्‍यांना‘आमचे सरकार आले तर बघून घेऊ’ अशी धमकी दिली होती.

Web Title:
संबंधित बातम्या