वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशी सुरू राहणार

बारामती: महावितरण बारामती परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ६ लाख १९ हजार ९८३ ग्राहकांकडे ११२ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकी वसुलीची मोहीम सुटीच्या दिवशीही सुरु असून, थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांसह चालू बिलांचा भरणा त्वरित करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी केले आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामती, सातारा, सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी ) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात सोमवारी दर्शवेळा अमावस्येनिमित्त स्थानिक सुट्टी असली तरी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार, रविवार व सोमवार असे तिन्ही दिवस सुरु राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top