मुंबई -विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे आदेश दिले आहेत.
विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात. काही लोक अशा तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढतात, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती गोळा करतानाचे फोटो टिपतात आणि धार्मिक भावना दुखावतील तसेच सार्वजनिक शांतता व भावना भंग पावतील असे फोटो प्रसारित अथवा प्रकाशित करतात.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी आदेश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नयेत अथवा ते प्रसारित करू नयेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहेत. 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील.लया आदेशाचे उल्लंघ केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, दंडही ठोठावला जाऊ शकतो.