इचलकरंजी- सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौर्यावर असलेले परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य १०८ श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांना राज्य सरकारने राजकीय अतिथी म्हणून घोषित केले आहे. विशुध्दसागरजी मुनी महाराज हे जैन समाजातील अत्यंत महनीय व्यक्ती आहेत.त्यांनी शांतता व अहिंसा या गोष्टींचा प्रचार,प्रसार केला आहे.
विशुध्दसागरजी मुनी महाराज यांनी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे. अहिंसेचा प्रसार, साहित्य व धार्मिक क्षेत्रात योगदान देणे अशी अनेक कामे ते आपल्या विहारादरम्यान करीत आहेत.त्यांचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी इतर धर्मिक तसेच परराज्यातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहेत.त्यांना राजकिय अतिथी घोषित करावे, अशी मागणी सर्वच जैन धर्मियांच्यावतीने करण्यात आली होती.त्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता देत परमपूज्य चांशिरोमणी आचार्य १०८ श्री विशुध्दसागरजी मुनी महाराज यांना राजकीय अतिथी म्हणुन घोषित केले आहे.
दरम्यान, विशुध्दसागरजी मुनी महाराज यांची २५ जानेवारीपासून रुकडी येथून पंढरपूरच्या दिशेने पदयात्रा सुरु आहे. १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान पंढरपूर येथे पंचकल्याणक होईल. त्यानंतर ५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पंढरपूर ते शिरसाड (मुंबई) अशी अकलुज-नातेपुते, यवत-पुणे-पनवेल-ऐरोली-साकीनाका, बोरीवली-गोरेगाव-शिरसाठ मार्गे पदयात्रा निघेल.