नाशिक- विरोधकांना त्रास देणे हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सत्ता त्यांच्या हातात आहे, सत्तेचा कसा उपयोग करायचा हे त्यांनी ठरवलेले आहे, विरोधकांना त्रास देण्याचा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे. त्यांचा त्रास सहन करावा लागेल. यावर नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते हे लोकांसमोर येणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्यभरात होत आहेत, त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात जास्त सभा होत असतील तर चांगले आहे. कारण लोकसभेच्या वेळेस ते १६ ठिकाणी आले त्यापैकी ११ जागांवर पराभव झाला होता, सभा घेणे हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे.