अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
विरार :
विरार रेल्वे स्थानकात रुळ ओलांडताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये पुरुष, महिला आणि तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तापस करत आहेत.
ही घटना गुरुवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. विरार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच यांच्यामधील रुळ ओलांडताना हा अपघात झाला. मेल एक्स्प्रेसने या कुटुंबाला जोरदार धडक दिली. यामध्ये 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला आणि तीन महिन्यांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरुष आणि महिला हे मूळ बिहारचे राहणारे असून ते मजुरीचं काम करतात. त्यांची ओळख अजून पटलेली नसून, विरार रेल्वे पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी नागरिक पुलाचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडून जात असतात. रेल्वे प्रशासन या बाबतीत नेहमी सूचना देत असते. मात्र या सूचनांकडे प्रवासी सातत्याने दुर्लक्ष करतात. त्यामुळे असे भीषण अपघात होतात.