विरार
विरारमध्ये ट्रक गटारात कोसळून एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
विरारच्या ग्लोबल सिटीहून ट्रक नारंगी फाटकाकडे जात होता.समोरून येणाऱ्या पिकअप जीपला साईड देत असताना ट्रक रस्त्यावरुन गटारात कोसळला. टॅकखाली महिलेचा मृत्यू तर पती पत्नी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.जखमींना विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. क्रेन सहाय्याने ट्रक गटारातून बाहेर काढण्यात आला. सुजाता शेलार असे मृत महिलेचे नाव आहे. अशोक शुक्ला आणि रमा शुक्ला हे पती-पत्नी जखमी झाले आहेत.
विरारमध्ये ट्रक गटारात कोसळून एकाचा मृत्यू
