तुळजापूर – विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रोजवरील मोजीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.धाराशिव आणि लातूर जिल्हा एकत्र असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. त्यांनी तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिवपदावरही काम केले आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.
विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर यांचे निधन
