नवी दिल्ली : उच्च शिक्षण संस्थांमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता मातृभाषेहूत उत्तरपत्रिका लिहिण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी याबाबत निर्णय जाहीर केला असून, विद्यापीठांना जरी अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात दिला जात असला तरीही विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये परीक्षा लिहिण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे.
यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी स्थनिक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले लिहा. त्यामुळे यूजीसीच्या वतीने विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत स्थानिक भाषांमध्ये उत्तरे लिहिण्याची परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. परीक्षा कार्यक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यापीठांना मूळ लेखनाचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर आणि अध्यापन-अभ्यास प्रक्रियेदरम्यान स्थानिक भाषेच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. तसेच विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी सीयुईटी युजी आणि सीयुईटी पीजी प्रवेश परीक्षा हिंदी, इंग्रजीसह १३ भारतीय भाषांमध्येही घेतल्या जातात. यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक भाषेत विषय समजून घेण्याबरोबरच परीक्षेतील कामगिरीही सुधारेल असे त्यांनी सांगितले.
जगदीश कुमार म्हणाले, विद्यार्थी त्याच्या मातृभाषेतील किंवा स्थानिक भाषेतील विषय समजू शकतो तसेच परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही भारतीय भाषांमधील अभ्यासाची शिफारस करण्यात आली आहे. या आधारावर विद्यापीठांना स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे. सध्या माध्यम अर्थातच इंग्रजी असले तरी लवकरच विविध भारतीय भाषांमध्येही पुस्तके तयार होतील, असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मूळ लेखनाचा स्थानिक भाषांमध्ये अनुवाद करण्यास चालना दिली जात आहे. त्यामुळे विद्यापीठांमध्ये अध्यापन-अध्यापन प्रक्रियेत स्थानिक भाषेचा वापर व्हायला हवा.