विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला चांदीने मढवण्याचे काम सुरु

पंढरपूर- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये केला होता. त्यानुसार नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्या वतीने या दरवाजाला चांदी बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. अरगुलकर कुटुंबातील शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजाला चांदी बसवली आहे. यासाठी ३० किलो चांदी लागणार असून याची किंमत सुमारे ३० लाख रूपये आहे. या दरवाजाचे काम मागील आठ दिवसापासून सुरू आहे. यामुळे भाविकांना इथून प्रवेश बंद ठेवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top