वाशीम
वाशीममध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केली. संदीप राठोड (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. ते वाशीमच्या मानोरा तालुक्यातील गव्हा येथील रहिवासी होते. त्यांनी आपल्या शेतात विष पिऊन जीवन संपवले. संदीप यांनी आई वडिलांच्या नावावर असलेल्या साडेतीन एकर जमिनीवर ४५ हजार रुपयाचे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जावर व्याज वाढत गेल्याने तसेच शेतातही काही पिकत नसल्याने कर्ज फेडणे कठीण झाले. या कर्जाला कंटाळून संदीप यांनी टोकाचे पाउल उचलले.