वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू देवराव खोरणे (३०) आणि अनिल देवराव खोरणे (२७) अशी या मृत भावांची नावे आहेत.
मृत राजू आणि अनिल हे दोघे भाऊ वाशिमवरून दुचाकीने आपल्या पारडी गावाकडे जात होते. त्याची गाडी मंगरूळपिरनजिक साखरा फाट्याजवळ आली असता रस्त्यावरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांची दुचाकी पूर्णतः ट्रकखाली जाऊन चक्काचूर झाली होती.
अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून वाशिम ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.