वाळूज – वाळूज उद्योग नगरीतील एनआरबी बेरिंग या कंपनीला आज सकाळी ६ च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीच्या गोदामातील साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक तपासात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. गोदामातील साहित्याला आग लागल्याने कामगार व सुरक्षारक्षकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात न आल्याने बजाज ऑटो, गरवारे व वाळूज अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, तरीही आग आटोक्यात येत नसल्याने खाजगी टँकरने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
वाळूजमधील कंपनीच्या गोदामाला भीषण आग
