Home / News / वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीचाही फैसला

वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीचाही फैसला

वायनाड – महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीबरोबरच उद्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेस...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वायनाड – महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीबरोबरच उद्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाड व रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर त्यांची बहीण व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली. प्रियांका गांधी यांनी आतापर्यंत निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी प्रचार केला असला तरी त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात राहुल गांधी यांनीही भाग घेतला होता. काँग्रेससाठी ही जागा प्रतिष्ठेची असून प्रियंका यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

उद्या महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही होत असून या काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसने त्यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात भाजपाने डॉ. संतुकराव हबर्डे यांना उमेदवारी दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या