मुंबई- महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून दूर केल्यानंतर उत्तराखंडातच स्थिर झालेले वादग्रस्त माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अचानक 6 दिवसांच्या मुंबई दौर्यावर आले आहेत. हा त्यांचा खासगी दौरा असून कोणत्याही राजकीय गाठीभेटी नाहीत असे सांगितले जात असले तरी त्यांच्या दौर्याची वेळ पाहता अपात्रतेच्या निर्णयाबाबत चर्चा करायला ते आले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे.
भगतसिंग कोश्यारी आज सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा काँग्रेसमधून भाजपात गेलेले उत्तर भारतीयांचे नवे नेते कृपाशंकर सिंग आणि इतर भाजपा कार्यकर्त्यांनी हारतुरे देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. भगतसिंग कोश्यारी 21 मे पर्यंत मुंबईत राजभवनात राहणार आहेत. त्यांच्या दौर्याची माहिती देताना कृपाशंकर सिंग म्हणाले की, ते पद सोडून देहराडूनला गेले होते, पण तिथे लोक त्यांना सतत भेटायला येत होते तसेच इथेही घडत आहे. आज व उद्या ते डॉक्टर, साहित्यिक अशा अनेक क्षेत्रातील लोकांना भेटतील. मग त्यांची डॉक्टरची अपॉइमेंट आहे. तिथून 21 मे रोजी ते घरी जातील. त्यांचा हा अराजकीय दौरा आहे असे सांगितले असले तरीही ते कुणाकुणाला भेटतात याकडे सर्वांचेच लक्ष राहील.
वादग्रस्त भगतसिंग कोश्यारी 6 दिवसांच्या मुंबई दौर्यावर
