आळंदी –
अतिरंजित दाव्यामुळे वादात सापडलेला ”द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना आळंदीतील एका रिक्षाचालकाने मोफत रिक्षा सेवा देऊ केलीय.
साधू मगर असे या चालकाचे नाव असून सध्या त्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या छायाचित्रात मगर हे त्यांच्या ऑटोरिक्षाजवळ उभे असल्याचे दिसत असून त्यांनी आपल्या रिक्षावर एक मोठा बॅनर लावला आहे. या बॅनरवर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांसाठी त्यांची आपली रिक्षा मोफत आहे, असा मजकूर आहे. तसेच त्यांच्या रिक्षामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या दहा महिलांसाठी ते मोफत तिकीटही देणार असल्याचे म्हटले आहे.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची जोरात चर्चा सुरू आहे. अनेक मुस्लीम संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
अधिकाधिक हिंदू महिलांनी हा चित्रपट पाहावा आणि इस्लामी कटांबद्दल जागरुक आणि सतर्क राहावे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी मोफत रिक्षा प्रवास घडवण्याची ऑफर दिली आहे, असे मगर यांचे म्हणणे आहे.