मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले आहे.
वीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केल्याने भाजप हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सावरकरांच्या नावाचा वापर करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला नमन करणारा देवाभाऊ !, महापुरुषांच्या आदर्शाचे स्मरण ठेवण्यासाठी हवी महायुती ! अशी जाहिरातबाजी भाजपने सोशल मीडियावर केली आहे.वास्तविक वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,लता मंगेशकर,इंदिरा गांधी, उद्योगपती रतन टाटा आदींची नावे देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे.परंतु या सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी भाजपने सोशल मीडियावरील जाहिरातीत केली आहे.