वलसाड
वलसाड जिल्ह्याच्या उमरगाम जीआयडीसी भागातील कंपनीला आज पहाटे भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने ही आग भडकली. या आगीमुळे लोकांमध्ये घबराट पसरली. या आगीचे कारण अद्याप उघड झालेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान 5 गाड्यांसह घटनास्थळी हजर झाले. जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या कंपनीने तयार केलेले केमिकल रस्त्यावर आणि गटारीत गेल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. एकापाठोपाठ एक आग तीन कंपन्यांमध्ये पसरली. या तीन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
वलसाडच्या उमरगामातील कंपनीला भीषण आग
