वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या धरणाची उंची वाढविण्यात आली होती. नदीत विसर्ग सुरू झाल्याने काचनूर, खरांगणा, आंजी, मोरांगणा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धनोडी येथील निम्न वर्धा धरणाचे ३ दरवाजेही ५० सेमीने उघडण्यात आल्याने वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर देवळी तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. सरूळ, अलमडोह, निमसडा, आलोडा, डिगडोह गावाचा संपर्क तुटला आहे.
वर्ध्याच्या महाकाळीतील धाम धरण ओव्हरफ्लो
