मुंबई – डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील ९ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यानंतरही संपकरी निवासी डॉक्टरांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. डॉक्टरांच्या संपाचे पडसाद गुरुवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात उमटले. निवासी डॉक्टर नसल्याने बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या रांगा लागल्या. परिणामी, रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागले.
निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळपासून संपावर होते. बाह्यरुग्ण विभागामध्ये एकही निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णसेवेचा भार वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापकांवर पडला. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर होऊन रुग्णांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. केवळ काही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.