Home / News / वनराज आंदेकर हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

वनराज आंदेकर हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. हल्लेखोरांना मध्य...

By: E-Paper Navakal

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. हल्लेखोरांना मध्य प्रदेशमधून पिस्तुल आणण्यास मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशेष मोक्का न्यायालयाने त्याला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड असे या आरोपीचे नाव आहे.खोंड याला अटक केल्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता २१ वर पोहोचली आहे.या व्यतिरिक्त दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आंदेकर यांची हत्या टोळी युद्धातून झाली असून हत्या करण्यासाठी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यात खोंड याने मदत केली होती,असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.आंदेकर यांची हत्या झाल्यानंतर अभिषेक खोंड पसार झाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या