नाशिक
वणी- नाशिक मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप आणि चारचाकीची धडक झाली. या धडकेत चारचाकीतील एक नाशिक शहर पोलीस कर्मचारी आणि एक महिला पोलीस ठार झाले. ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर काल रात्री ९ च्या सुमारास हा अपघात झाला. ज्ञानेश्वर एन. रौंदळ व रेणूका भिकाजी कदम अशी मृत पोलिसांची नावे आहेत.
प्रवाशी वाहतुक जीप क्रमांक ही नाशिकच्या बाजूने वणीकडे वेगात जात असतांना समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीला जीप धडकली. यात ज्ञानेश्वर आणि रेणूका हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. त्यांना वणी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनाली गायधनी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सप्तशृंगी गडावरुन चैत्रोत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर हे पोलीस अधिकारी घरी परतत होते. वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.