वडूज – रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेत दोन वयोवृद्ध महिला जखमी झाल्या.
वडूजमधील इंदिरानगर येथे घडलेल्या या घटनेत घरगुती सिलेंडरने पेट घेतला. त्यामुळे ताराबाई नाना आवळे (७५) व त्यांच्याकडे आलेल्या सत्यभामा बळवंत खुडे (७०) या दोघी भाजल्या. यावेळी घरातील सामानाचेही खूप मोठे नुकसान झाले. दोन्ही महिलांवर वडूज येथील डॉक्टर नारायण बनसोडे यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.