मुंबई
वडाळा – कासारवडवली या मुंबई मेट्रो मार्ग-४ प्रकल्पाच्या खर्चात १२७४.८० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच या प्रकल्पात ५ वर्षांची दिरंगाई झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून ही माहिती उघड केली असून यामुळे एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश पडला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- ४ वडाळा – कासारवडावलीचे काम आर इन्फ्रा-अस्तालडी आणि सीएचईसी-टीपीएल या कंपन्यांना १२ एप्रिल २०१८ रोजी देण्यात आले होते. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ हा ३२.३२ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गामध्ये एकूण ३० स्थानके आहेत. सदर काम जुलै २०११ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन ऑगस्ट२०२६ ही नवी डेडलाइन अशी आहे.
अनिल गलगली यांनी प्रकल्पाच्या खर्च वाढीमुळे आणि वेळेत काम पूर्ण न होण्यामुळे दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. खर्चात वाढ आणि ५ वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु अद्याप तशी कारवाई करण्यात आलेली नाही.