पुणे – पुणे- सोलापूर मार्गावरील काळभोर फाट्यावर अचानक एक कार आडवी आल्यानंतर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
या अपघातातील मृत तरुणाचे नाव हनुमंत बळीराम जाधवर (३८) असे असून तो धाराशीव येथे राहत होता.दुचाकीस्वार अप्पासाहेब नंदगावे हा हनुमंत जाधवर याच्यासह दुचाकीवरून लोणी काळभोर येथून हडपसरकडे चालला होता.त्यांची दुचाकी लोणी काळभोर फाटा चौकात आली तेव्हा अचानक एक कार आडवी आली.त्यावेळी त्यांनी दुचाकी थांबवली.पण लगेच पाठीमागून आलेल्या दुसर्या कारने दुचाकीला धडक दिली.या हनुमंत हा गंभीर जखमी झाला रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.अपघातानंतर अपघातग्रस्त कार चालक पसार झाला झाला असून लोणी काळभोर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.