नवी दिल्ली – लोक जनशक्ति पार्टीचे (लोजपा) नेते हुलास पांडे यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर आज इडीने छापे टाकले. पाटणा, बंगळुरु आणि दिल्लीमध्ये एकाच वेळी इडीने हे धाडसत्र राबवले.
हुलास पांडे हे लोजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे निकटवर्तीय मानले जातात.आर्थिक गैरव्यवहारासंबंधीच्या प्रकरणात इडीने ही छापेमारी केल्याचे सांगितले जाते. मात्र हुलास पासवान यांच्या मालमत्तांवर कोणत्या गुन्हयासाठी छापे टाकले याबाबत अधिकृत माहिती देण्यास इडीने नकार दिला.
सन २०२३ मध्ये सीबीआयने २०१२ सालच्या एका खून खटल्यात हुलास पांडे यांचा समावेश आरोपींच्या यादीत केल्यानंतर हुलास यांनी पक्षाच्या संसदीय मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.