मुंबई -मुंबईतील लोखंडवाला जंक्शनचे आता श्रीदेवी जंक्शन असे नामकरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच परिसरातील ग्रीन एकर्स इमारतीत श्रीदेवी राहात होत्या. श्रीदेवी यांची अंतिम यात्रा याच रस्त्यावरून निघाली होती. स्थानिकांच्या मागणीवरून या चौकाला श्रीदेवी यांचे नाव देण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचा दुबई येथे गूढ मृत्यू झाला होता.
लोखंडवाला जंक्शनआता श्रीदेवी चौक
